chhagan bhujbal on sharad pawar 
Vidhansabha Election

'शरद पवारांनी शिवसेनेचे 18 ते 20 आमदार फोडले' छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनी केले. मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो. शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले”, असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला.

Published by : Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचारसभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना अनेक खळबळजनक दावे केले.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, महापौर केलं. याबद्दल मी अनेकदा आभार मानले आहेत. आता शरद पवार का बोलले? मला कळत नाही. शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनी केले. मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो. शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले”, असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला. “मी काय फोडू शकत नव्हतो. माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं, म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं, बदनाम करण्यासाठी निवडणूकीत बोललात”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

'शरद पवार यांनी शिवसेनेचे 18 ते 20 आमदार फोडले', छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवारांनी केलं असल्याचे वक्तव्य भुजबळांनी केलं आहे. शिवसेना सोडण्यासाठी पवारांनी प्रवृत्त केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Guru Purnima 2025: 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु...'; गुरुपौर्णिमा दिनानिमित्त आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला