Covid-19 updates

महाराष्ट्रात ४७ वेळा कोरोनाने बदलला रंग!

Published by : Lokshahi News

महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना व्हायरसने तब्बल 47 वेळा आपला रंग बदलला आहे. इतर राज्यांमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ही अतिशय घातक असेल. कारण कोरोना व्हायरसच म्युटेशन झपाट्याने वाढत आहे.

गेल्या तीन महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात नागरिकांमध्ये नवनवे वेरिएंट असल्याचे उघडकीस झाले. या दरम्यान प्लाझ्मा, रेमडेसिविर आणि स्टेरॉयडयुक्त औषधांचा अति वापर केल्यामुळे म्युटेशनमध्ये वाढ झाली आहे. यामुळे इतर राज्यातही सिक्वेसिंग वाढवण्याची गरज आहे.

यातील अनेक म्युटेशनबाबत अगोदरच माहिती होती. मिळालेल्या माहितीनुसार, म्युटेशनमध्ये होत असलेल्या बदलामुळे मोठी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनसीडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.1.617 वेरिएंट आतापर्यंत 54 देशात सापडलं आहे. यातील एका म्युटेशनला डेल्टा वेरिएंट असं नाव WHO ने दिलं आहे.

अभ्यासात काय म्हटलंय?
यावर्षात कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाचं संक्रमण वाढलं. नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत 733 नमुने एकत्र करण्यात आले. यांच्या अध्ययनावर हा अभ्यास अवलंबून आलं आहे. या सगळ्या नमुन्यांमध्ये 47 वेळा व्हायरसचे म्युटेशन अनुभवण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा