India

Corona In India | देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात ४४ हजार ६४३ नवे रुग्ण

Published by : Lokshahi News

देशातील कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झाल्याचं चित्र नाहीय. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 643 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 464 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 41 हजार 96 इतकी आहे.

सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 4 लाख 14 हजार 159 इतकी असून आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 26 हजार 754 जणांचा मृत्यू झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा