Covid-19 updates

दाक्षिणात्य ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळे अडकले आहेत. त्यातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याने ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. तो सध्या होम क्वारंटाइन आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. माझे संपूर्ण कुटुंब आणि मी घरात आयसोलेशमध्ये आहोत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. माझ्या संपर्कात गेल्या काही दिवसात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही कोरोना चाचणी करुन घ्या. सुरक्षित राहा, अशा आशयाचे ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका

Rajshree More Apologizes : मराठी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने अखेर मागितली माफी; Video Viral