Vidhansabha Election

'आघाडीचा "महाराष्ट्रनामा" म्हणजे विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा' शेलारांची टीका

आशीष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या 'महाराष्ट्रनामा' जाहीरनाम्यावर तीव्र टीका केली, म्हणाले 'विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा'. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीतील राजकीय वाद वाढण्याची शक्यता.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. १० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन 'महाराष्ट्रनामा' जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

  2. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर ट्विट करत, "महाराष्ट्रनामा म्हणजे विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा" असे आरोप केले.

  3. शेलार यांच्या टीकेमुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. . याच दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्रनामा' या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’असे नाव देण्यात आले आहे. यावरुनच आता भाजपच्या आशीष शेलार यांनी ट्विट करत टीका केली आहे. 'आघाडीचा "महाराष्ट्रनामा" म्हणजे विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा' अस म्हणत त्यांनी टीका केली आहे.

आशीष शेलार यांच ट्विट

आघाडीचा "महाराष्ट्रनामा" म्हणजे नेमके काय? विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा यापेक्षा काय न्हाय. कोविडमध्ये जनतेने पाहिले यांचे कारनामे. कफनामध्ये पण हे कटकमिशन खाणारे.माझे कुटुंब माझी जबाबदारी ही यांची घोषणा. बगलबच्चांना कंत्राटे वाटणे एवढीच यांची रचना."जय महाराष्ट्र" म्हणणारे ऐवढे बदलेत. शहरी नक्षलवाद्यांच्या झोळीत जाऊन पडलेत."कॉम्रेड" हे उबाठा प्रमुखांचे नवे पदनाम. त्यांना आमचा लाल सलाम..! लाल सलाम !! अस म्हणत त्यांनी पोस्ट केली आहे.

काँग्रेसचा जाहीरनाम्यात काय?

  • महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात मिळणार

  • महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणणार

  • ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज,

  • नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर

  • सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरणार

  • एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती करणार

  • सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार

  • सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार

  • महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर भर

  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करणार

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवणार

  • शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करून २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा