CSK आणि KKR भिडणार आमनेसामने 
IPL T20 2021

IPL 2022: आयपीएलला आजपासून सुरुवात, CSK आणि KKR भिडणार आमनेसामने

Published by : Shweta Chavan-Zagade

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दहा संघ मैदानात उतरणार आहेत. CSK आणि KKR यांच्यातील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्हीही कर्णधार हा सामना जिंकण्यासाठी आपली बाजी पणाला लावतील. कोलकताचा कप्तान श्रेयस अय्यर तर चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजा असणार आहे.

मागील आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. यावेळच्या आयपीएलमध्ये सीएसके संघाने महत्त्वाच्या खेळाडूंना रिटेन केलं आहे. तसेच रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाची पहिल्याच सामन्यात कसोटी असणार आहे. दोन्ही संघात झालेल्या सामन्यांची आकडेवारी बघितली असता कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्जचं पारडं जड आहे.

या दोन्ही संघामध्ये एकूण २५ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १७ सामन्यात विजय मिळवला असून कोलकाता नाइट रायडर्सला केवळ ८ सामन्यातच विजय मिळवता आलेला आहे.

फँटसी 11 मध्ये कोण कोणते खेळाडू असणार

विकेट किपर म्हणून सैम बिलिंग्स आणि एमएस धोनी टीममध्ये असू शकतात. बिलिंग्सने IPL मध्ये 22 मैच खेळल्या असून 334 रन बनविले आहेत. त्यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 133.6 इतका होता. दुसरा विकेट किपर म्हणून एमएस धोनी टीममध्ये असू शकतो. हे सीजन धोनीचे शेवटचे सीजन ठरू शकते. त्यामुळे या सीजनला धोनी चांगली खेळी करू शकतो. मागच्या सीजनच्या क्वालिफायर-1 मध्ये धोनीने शानदार बल्लेबाजी करत 6 बॉलमध्ये नाबाद 18 रनांची खेळी करून चेन्नईसाठी फायनलचे तिकीट घेत फॉर्म वापस येण्याचे संकेत दिसत होते.

फँटसी 11 मध्ये बल्लेबाज डेवोन कॉनवे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, ऋतुराज गायकवाड यांची निवड होऊ शकते. ऋतुराज मागच्या सीजनला फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने 16 मैचमध्ये 45.35 च्या शानदार औसतने 635 रन केले होते. तर श्रेयस अय्यर प्रथमच कोलकतासाठी खेळताना दिसणार आहे. मागील एका वर्षांपासून त्याच्या बल्ल्याद्वारे कमाल प्रदर्शन करत होता. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये त्याचा बल्ला जोरदार चाललेला दिसून आला. ऑक्शनमध्ये त्याला कोलकाता टीमने 12.25 करोडमध्ये विकत घेऊन कप्तान बनविले. नितीश राणा आणि डेवोन कॉनवे देखील आपल्या बल्ल्याद्वारे कमाल दाखवू शकतील.

आंद्रे रसेल बल्लेबाजी सोबतच गेंदबाजीतही कमाल प्रदर्शन करू शकतो. रसेल लांब छक्के मारण्यात माहीर आहे. चेन्नई विरुद्ध त्याने 11 सामन्यात 42.85 च्या औसतने 300 रन बनविले. त्यासोबतच 8 विकेट पटकावल्या होत्या. तसेच चेन्नईचा नवा कप्तान रवींद्र जडेजाकडे लक्ष असणार आहे.मागच्यावर्षी जडेजाने बल्ला आणि गेंद या दोन्हीमध्ये कमाल प्रदर्शन केले असून 16 सामन्यात 75.66 च्या औसतने 227 रन केले होते. त्यासोबत 16 विकेट आपल्या नावे केल्या होत्या.

बॉलिंगमध्ये ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने आणि वरूण चक्रवर्तीला सामील करू शकता. कोलकतासाठी चक्रवर्तीने
मागच्या सीजनमध्ये कमाल प्रदर्शन केले होते. त्याने 17 सामन्यात 18 विकेट त्याच्या नावे केल्या आहेत. तसेच एडम मिल्ने हादेखील एक चांगला ऑप्शन असेल.

या सामन्याची सुरूवात कधी ?
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होणार आहे. त्यानंतर सामन्याला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, आयपीएल लीगचे सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत. एकूण ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २० सामने, सीसीआयचे १५, डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहे. तर पुण्यात एमसीए स्टेडियमवर १५ सामने खेळवले जाणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट