India

11 तास समुद्राच्या पाण्यात, नौदलामुळे आम्ही जिवंत! ONGC कामगार ढसाढसा रडला

Published by : Lokshahi News

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या 276 कामगारांपैकी 184 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. आज हे कर्मचारी मुंबईच्या किनाऱ्यावर सुखरुप पोहोचले असून 11 तास समुद्राच्या पाण्यात लाईफ जॅकेटवर तरंगत होतो, नौदलाने वाचविले नाहीतर कोणीत जिवंत राहिला नसता, अशी प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

तौक्ते चक्रीवादळात हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज Barge P305 बुडाली होती. यावरील 184 जणांना वाचविण्यात आले आहे. आम्ही आताच आयएनएस कोचीवरून 125 जणांना आणल्याचे जहाजाचे कॅप्टन सचिन सिकेरिया यांनी सांगितले. समुद्रातील परिस्थिती आता निवळत आहे. अद्याप काही जणांचा शोध सुरु आहे. आम्ही अजून आशा सोडलेली नाही. आम्ही वाईट घटना मागे सोडून आलो असू असे वाटते, असे ते म्हणाले.

दरम्यान, नौदलाने अरबी समुद्रात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोठमोठ्या युद्धनौकांसोबत आयएनएस तेज, आयएनएस बेतवा, आयएनएस बीस आदी युद्धनौका आणि विमाने शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. अद्याप 89 कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आता वाचविण्यात आलेल्या लोकांकडे लाईफ जॅकेट होती. यामुळे या बेपत्ता लोकांकडेदेखील लाईफ जॅकेट असतील अशी आशा नौदलाला आहे. यामुळे हे कामगार तरंगत असले तर आपल्याला वाचविता येतील. यामुळे नौदलाने अद्याप आशा सोडलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद