अध्यात्म-भविष्य

Daily Horoscope 14 July Rashi Bhavishya: 'या' राशींना प्रेमात मिळणार विशेष अनुभूती

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता. तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. परदेशातील व्यवसायात आर्थिक हानी संभवते. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देताल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. प्रवासामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : उत्साह वाढेल. सामानाकडे लक्ष ठेवा चोरी जाण्याची शक्यता. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. भागीदारीतील प्रकल्पात अनेक प्रश्न निर्माण होतील. प्रवास आणि शैक्षणिक सहली होतील. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : धन लाभ होऊ शकतो. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे पार्टीचे वातावरण तयार होईल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer Horoscope Today) : कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. राग अनावर होऊ देण्याची गरज नाही. धन लाभ होण्याची शक्यता. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope Today) : तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती राहील. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केल्याने जोडीदार वैतागून जाईल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. प्रवास आणि शैक्षणिक सहली ठरतील. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला सरप्राइझ देईल.

कन्या (Virgo Horoscope Today) : संयम बाळगा, हमखास यशप्राप्ती होणार आहे. उधारी परत करावी लागू शकते. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. कामातील दबावामुळे मानसिक अशांती वाढेल. मार्केटिंग क्षेत्रात येण्याची आपली दीर्घकाळ असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. नोकरी मिळविण्यात आलेल्या सर्व अडचणी दूर होतील.

तूळ (Libra Horoscope Today) : आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमचा मानसिक तणाव वाढेल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : धन संबंधितील कोर्ट-कचेरीत तुम्हाला विजय मिळू शकतो. धन लाभही होऊ शकतो. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आर्थिक योजनेत गुंतवण्यापुर्वी सल्ला घ्या. सहलीला जाण्याची शक्यता. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. सकारात्मक निकाल मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

मकर (Capricorn Horoscope Today) : धन गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : ध्यानधारणा आराम मिळवून देईल. आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

मीन (Pisces Horoscope Today) : व्यवहाराबाबत सावध राहा. धन लाभ होण्याची शक्यता. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mira Bhayandar : कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केला म्हणून मीरा-भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना रॉडने मारहाण

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune : पुण्यात सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Khalid Ka Shivaji : 'खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा'; हिंदू महासंघ आक्रमक