Rashi Bhavishya Team Lokshahi
राशी-भविष्य

Horoscope राशीभविष्य |या राशीच्या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होतील, वाचा कसा तुमचा दिवस

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य.

Published by : Team Lokshahi

मेष (Aries Horoscope)

नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. जास्त खर्च होईल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. जास्त राग टाळा. काही जुन्या समस्यांपासून तुमची सुटका होईल.

वृषभ (Taurus Horoscope)

व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. उत्साह वाढेल. कोणतेही चांगले काम करण्याच्या स्थितीत असेल. व्यवसायासंबंधीत लोकांना भेटूगाठी वाढू शकतात. मन प्रसन्न राहील.

मिथुन (Gemini Horoscope)

योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा. मानसिक चंचलतेला आवर घालावा. कामातही रस वाटणार नाही. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात सुसंवाद ठेवा. नोकरीत उत्पन्न वाढेल.

कर्क (Cancer Horoscope)

व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाचच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका. वेगवेगळ्या स्तरावर कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल. नवीन व्यवसाय करण्यासाठी ही वेळ चांगली आहे.

सिंह (Leo Horoscope)

मनामधील चुकीचे विचार काढून टाकावेत. मित्रांशी संभाषण करताना जपून करा कारण त्यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. वागण्यामध्ये संयम ठेवावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. व्यवयाय स्थिर राहील, चुकीच्या संगतीपासून दूर रहा.

कन्या (Virgo Horoscope)

दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. कामात मन लागेल, साथीदाराशी मतभेद उद्भवतील, शारिरीक कष्ट होतील. नोकरदारांची कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

तूळ (Libra Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नवीन गुंतवणूक करताना विचारपुर्ण निर्णय घ्यावा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक प्रगती होईल, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मन प्रसन्न राहील. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या नकारात्मक वागणुकीमुळे तुमच्यात निराशा निर्माण होईल. व्यवसायात अनेक अडचणी येतील. आज महत्त्वाचे निर्णय न घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

धनु (Sagittarius Horoscope)

कोणतेही प्रश्न शांततेने सोडण्याचा प्रयत्न करावा. योग्य वेळेसाठी थांबावे लागेल. धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, घाई गडबड करू नका, प्रवास सत्कारणी लागेल. भांडण आणि वादापासून दूर राहा. नोकरदार वर्गाने महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी सज्ज व्हावे.

मकर (Capricorn Horoscope)

प्रवासात कोणत्याही प्रकारची घाई करू नका. आपले मत शांततेने मांडावे. मित्रपरिवारासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. शारीरिक आणि मानसिक आनंद अनुभवाल. उत्पन्न वाढेल. काम सहज पूर्ण होईल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

नोकरी-व्यवसायामध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घरात आनंद वातावरण राहील. बोलण्याआधी सारासार विचार करावा. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.

मीन (Pisces Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करता येईल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. हातातील कलेला वाव द्यावा. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर