जर डिसेंबर महिन्यात तुम्ही बँकेची कामे करत असाल तर ही यादी नक्का पाहा. कारण या महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या सुट्टयांप्रमाणे बँकांची कामे करता येणार आहे.
डिसेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2021 साठी शेअर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार डिसेंबरमध्ये सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका 12 दिवसांपर्यंत बंद राहतील.सण आणि ख्रिसमस, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन पुढील महिन्यात रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार वगळता एकूण सात सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात.
विशेष म्हणजे बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार आणि काही खासगी बँकांमध्ये वेगवेगळ्या असतात. शिवाय सुट्ट्या तीन टप्प्यांत विभागलेल्या आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट अंतर्गत हॉलिडे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत हॉलिडे आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँकांचे क्लोजिंग अकाऊंटला अशा सुट्ट्या विभागल्या गेल्यात. यंदा नाताळची सुट्टी डिसेंबर महिन्याच्या चौथ्या शनिवारी येत आहे.
सुट्ट्यांची संपूर्ण यादी
3 डिसेंबर : सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणानिमित्त गोव्यात बँका बंद
5 डिसेंबर : रविवार
11 डिसेंबर : दुसरा शनिवार
12 डिसेंबर : रविवार
18 डिसेंबर: यू सो सो थामच्या पुण्यतिथीनिमित्त फक्त मेघालयमध्ये बँका बंद राहणार आहेत.
19 डिसेंबर : रविवार
24 डिसेंबर: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला
25 डिसेंबर: ख्रिसमस/चौथा शनिवार
26 डिसेंबर : रविवार
27 डिसेंबर: ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद राहतील)
30 डिसेंबर : शिलाँगमध्ये बँका बंद
31 डिसेंबर : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयझॉलमध्ये बँका बंद राहणार आहेत