राज्य बोर्डांनी बारावीचा निकाल ३१ जूलैपर्यंत जाहीर करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासोबतच बारावीच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धतीची योजना लवकरात लवकर तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.
कोरोना महामारीमुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. काही पालक आणि विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
सुप्रीम कोर्टाने CBSE आणि CISCE बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन निकष ठरवण्यास सांगितले होते. आता अशाच प्रकारचे निर्देश कोर्टाने राज्य बोर्डांना दिले आहेत.