Candidates Profile

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकरांनी चौथ्यांदा गड राखला; सावंतवाडीमधून विजय

दिपक केसरकर चौथ्यांदा २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवित आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला लागले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरवातीचे कल पाहता राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी घेतलेली पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघातून दिपक केसरकर विरुद्घ राजन तेली अशी लढत पाहायला मिळाली. या लढतीमध्ये आता दिपक केसरकर यांचा विजय झाला आहे.

उमेदवाराचे नाव - दीपक वसंत केसरकर

मतदारसंघ - सावंतवाडी

पक्ष- शिवसेना

समोर कुणाचं आव्हान - राजन तेली

दिपक केसरकर चौथ्यांदा २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवित होते. 2001 मध्ये थेट जनतेतून राष्ट्रवादीच्या तिकीटावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादीत आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. 2009 मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवराम दळवींचा पराभव करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2012 मध्ये नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना डीपीडीसीच्या बैठकीत दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचे बिनसले. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत निलेश राणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडले.

निलेश राणेंच्या खासदारकीच्या पराभवानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीआधी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा विधानसभेवर 2014मध्ये निवडून गेले. यानंतर ग्रामविकास आणि अर्थराज्यमंत्री पद मिळाले. पालकमंत्री पद उद्धव ठाकरे यांनी दिपक केसरकर यांना दिलं. याच कालावधीत गृहराज्यमंत्री पदी बढती करण्यात आली.

2019मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद दिले नाही. यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे सरकार बसल्यानंतर महत्त्वाची प्रवक्ते पदाची जबाबदारी शिवसेनेची त्यांनी सांभाळली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना शालेय शिक्षणमंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद दिले.

दिपक केसरकर यांचे प्लस पॉईंट्स पाहिले तर सावंतवाडीत असलेल्या मोती तलावाचं सुशोभीकरण त्यांनी केलं आहे. अनेक पर्यटक हा मोती तलाव बघण्यासाठी येत असतात. यासोबतच केसरकर यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ले येथे पाणबुडी प्रकल्प येणार असून सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. तसेच वेंगुर्लातील झुलता पूल. जो पर्यटकांना आकर्षिक करत आहे. अनेक पर्यटक याला भेट देण्यासाठी येत असतात. दिपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा