पाकिस्तानमधील प्रदूषित हवेचा परिणाम दिल्लीवर होत असून आमचा याच्याशी काही संबंध नसल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. उत्तर प्रदेशातील उद्योगांचा दिल्लीतील प्रदूषणात कोणताही हात नसल्याचं योगी सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या खंडपीठासमोर दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषणावरील याचिकेवर सुनावणी पार पडली.
यावर सरन्यायाधीशांनी "मग आम्ही दिल्लीमधील उद्योगांवर बंदी आणावी असं तुम्हाला वाटत आहे का?" अशी विचारणा केली. रणजीत कुमार यांनी यावेळी आठ तासांच्या निर्बंधांमुळे उत्तर प्रदेशातील साखर कारखाने आणि दूध उद्योगाला मोठा फटका पडेल असं सुप्रीम कोर्टात सांगितलं.