India

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिमला आजन्म जन्मठेप

Published by : Lokshahi News

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलीय. बाबा राम रहीम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते.

सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टात 8 ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज निकालाचं वाचन करण्यात आलं.सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहीम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. विशेष म्हणजे कोर्टाने राम रहीम यांना 31 लाख तर इतर चार आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...