देश-विदेश

100 rs Coin : आता 100 रुपयांचंही येणार नाणं ; जाणून घ्या नाण्याची खास वैशिष्ट्ये

डॉ. स्वामिनाथन यांच्या स्मृतींना अभिवादन ; १०० रुपयांचे विशेष नाणं

Published by : Team Lokshahi

हरित क्रांतीचे जनक आणि भारतीय कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे वैज्ञानिक प्रा. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारकडून १०० रुपयांचे एक विशेष स्मरणिका नाणं जारी करण्यात येणार आहे. ११ जुलै २०२५ रोजी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून हे नाणं कोलकाता येथील भारत सरकारच्या टाकसाळीत तयार होणार आहे.

या विशेष नाण्याचं वजन ३५ ग्रॅम असून त्याचा व्यास ४४ मिमी इतका आहे. नाण्याच्या कडेवर २०० खाचा असणार आहेत. हे नाणं चतु:धातू मिश्रधातूपासून बनवण्यात येणार असून त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के झिंक यांचा समावेश असणार आहे. नाण्यावर भारताचा राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि डॉ. स्वामिनाथन यांचा चेहरा कोरलेला असेल. हे नाणं त्यांच्या कार्याची आठवण जपणारे ऐतिहासिक चिन्ह ठरणार आहे.

डॉ. स्वामिनाथन यांनी १९६०च्या दशकात भारतात हरित क्रांती घडवून आणत देशाला अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याचे मोठे कार्य केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शास्त्रीय उपायांची शिफारस केली आणि भारताच्या अन्न सुरक्षेला मजबूत आधार दिला. त्यांच्या या योगदानामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं.

भारत सरकारने त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत २०२४ मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले. आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जारी होणारे हे विशेष नाणं त्यांच्या स्मृतींचं प्रतीक बनून कायमस्वरूपी इतिहासात स्थान मिळवणार आहे. हे नाणं केवळ चलन नसून, डॉ. स्वामिनाथन यांच्या शाश्वत कार्याला दिलेला राष्ट्रीय अभिवादन ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारला दंगल घडवायची आहे..." जरांगेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारने पाठवलेल्या लोकांचा गोंधळ" जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....

Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली