काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादयांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले. देहूरोड मधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे देखील त्याचवेळी काश्मीरमध्ये, पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब व्हॅली याठिकाणी श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते.
त्यावेळी बेताब व्हॅली याठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत हे आपल्या मुलीचा रिल्स काढत होते. हे रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती NIAला दिली असून या व्हिडिओ आणि फोटोची संपूर्ण तपासणी ही NIA कडून केली जात आहे.