Tahawwur Rana 
देश-विदेश

26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

Published by : Gayatri Pisekar

डेव्हिड कोलमन हेडली (David Coleman Headley) ऊर्फ दाऊद सय्यद गिलानीमुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला आता भारताच्या स्वाधिन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला आहे. लवरकच तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजिल्स येथे तुरूंगात आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणा हा मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिक मारले गेले. ज्यामध्ये ६ अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. तसेच लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा सांगण्यात येत आहे.

तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला. पाकिस्तानी सैन्यात त्याने वैद्यकीय सेवा दिली. त्यानंतर १९९७ साली तो कॅनडाला स्थलांतरीत झाला आणि २००१ मध्ये तिथलं नागरिकत्व त्याने मिळवलं. आणि कालांतराने तो अमेरिकेत स्थलांतरीत झाला. तिथे त्याने इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाला.

दहशतवादी कारवाईसाठी हेडलीसोबत हातमिळवणी

लष्कर-ए-तोयबातील डेव्हिड कोलमन हेडली (David Coleman Headley) ऊर्फ दाऊद सय्यद गिलानी यांचा राणा हा मित्र आहे. राणाने हेडलीला त्याच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सीचा उपयोग भारतात पाळत ठेवण्यासाठी आणि दहशतवादी कारवाईसाठीच्या मोहिमेसाठी मदत केली. 26/11 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यासाठी मोहिमा आखल्या. ज्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरिमन हाऊससारख्या स्थानांना लक्ष्य केलं.

२०११ मध्ये डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला

२००८ मध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राणाच्या कायदेशीर अडचणी सुरू झाल्या. ऑक्टोबर २००९ त्याला हेडलीसह अमेरिकेत अटक करण्यात आली. हेडलीने तपास यंत्रणांना सहकार्य केले आणि राणाच्या विरोधात साक्ष दिली. परंतु नंतर त्याने आपले निर्दोषत्व कायम ठेवले आणि दावा केला की त्याच्याशी हेराफेरी करण्यात आली आहे. २०११ मध्ये डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. परंतु २६/११ च्या हल्ल्याशी थेट संबंधित आरोपातून निर्दोष मुक्त झाले होते. जानेवारी २०१३ मध्ये त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

भारताने राणाच्या प्रत्यार्पणासाठी पाठपुरावा औपचारिकपणे डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झाली. राणाच्या गुन्ह्यांसाठी भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार प्रत्यार्पण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन करून बायडेन प्रशासनाने भारताच्या विनंतीला पाठिंबा दिला. अमेरिकेतील कनिष्ठ न्यायालय आणि नाईन्थ सर्किट (Ninth Circuit) न्यायालयामधून अपील फेटाळल्यानंतर अखेर राणाने नोव्हेंबर 2024 मध्ये यूएस सुप्रीम कोर्टात शेवटची याचिका दाखल केली. प्रत्यार्पण टाळण्यासाठी त्याने प्रयत्न केले. अखेर त्याचे हे सर्व प्रयत्न फोल ठरले. आणि तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताचा महत्त्वपूर्ण विजय म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक