देश-विदेश

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला; महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 26 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाज आला नाही. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे हे पत्नी आणि मुलीसोबत तर कौस्तुभ गणबोटे पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. यावेळी गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

डोंबिवली पश्चिम मध्ये राहणारे अतुल मोने, हेमंत जोशी, आणि संजय लेले, यांचा मृत्यू झाला. हे तिन्ही कुटुंब दोन दिवसापूर्वी पत्नी मुलांसोबत काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते, मात्र दहशदवादी हल्यात हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, या तिघांचा मृत्यू झाला आहे. पनवेलच्या दिलीप देसले यांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पुण्यातील 2, डोंबिवलीतील 3, पनवेलमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?