देश-विदेश

Pahalgam Attack : कलमा पढल्यामुळे हिंदू प्राध्यापकाचा जीव वाचला; कलमा म्हणजे काय?

मात्र या हल्ल्यावेळी कलमा पढल्याने प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य या व्यक्तीचे प्राण वाचले.

Published by : Shamal Sawant

सध्या देशभरात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे. पहलगाममध्ये सुट्टीचा आनंद घालवत असलेल्या पर्यटकांना धर्म विचारला गेला. हिंदू असल्याचे समजताच त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. यामध्ये 28 नागरिकांचा बळी घेण्यात आला. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून तसेच कलमा पढण्यास सांगून पर्यटकांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र या हल्ल्यावेळी कलमा पढल्याने प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य या व्यक्तीचे प्राण वाचले.

देबाशिष भट्टाचार्य यांनी सांगितली आपबिति :

यावेळी देबाशिष भट्टाचार्य यांनी सांगितले की, "माझ्या बाजूला प्रत्येक जण कलमा पढत होता. तेवढ्यात एका दहशतवाद्याने माझ्यावर बंदूक रोखली. माझं बोलणं ऐकलं आणि निघून गेला. मी केवळ 'ला इलाही'चा जप करत होतो. त्यामुळे देबाशिष यांचे प्राण वाचले. पण कलमा म्हणजे काय? त्याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

कलमा म्हणजे काय?

इस्लाममध्ये कलमाला महत्त्वाचे स्थान आहे. इस्लाम स्वीकारण्यासाठी सर्वात आधी 'कलमा तैय्यबा' वाचणे आवश्यक आहे. कलमा दोन भागात पठण केला जातो. 'ला इलाहा इल्लल्लाहू मुहम्मदुररसूल्लाही' हा पहिला भाग असतो.तसेच दुसरा भाग म्हणजे 'मुहम्मद सल्लल्लाहू अलैहि वसल्लम अल्लाहचे रसूल आहेत." म्हणजे अल्लाह हाच तो देव आहे ज्याची मुस्लिम पूजा करतात आणि ज्याच्यापुढे नतमस्तक होतात. इस्लाममध्ये सहा मुख्य कलमे आहेत. ती मदरशामध्ये शिकवली जातात.

कलमा कधी पठण केला जातो?

नमाजच्या आधी आणि नंतर, संकटाच्या वेळी, रोजच्या प्रार्थनेत, मृत्यूच्या वेळी, इखाद्याला इस्लाम धर्मात परावर्तीत करताना कलमा पठण केला जातो. याशिवाय कलमा कधीही पठण केला जातो, असेही सांगितले जाते. तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही तो म्हणू शकता. कलमा पठण हे अल्लाहला सर्वात प्रिय समजले जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित