पहलगाममध्ये 26 पर्यटकांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 23 वर्षीय आरोपी इम्तियाज अहमद मागरेचं शव सापडलं आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय सेनेने मागरेला ताब्यात घेतलं होत. पोलिसांच्या माहितीनुसार इम्तियाज मागरे हा दहशतवाद्यांचा ऑन ग्राऊंड वर्कर होता.
संशयित आरोपी इम्तियाज मागरे याने दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची कबुली दिली आहे. सेनेच्या चौकशीत मागरेने दहशतवाद्यांच्या एका ठिकाण्याची माहिती दिली होती. तसंच सेना त्याला घेऊन दुसऱ्या ठिकाणाकडे निघाली होती.
यावेळी इम्तियाजने सेनेच्या तावडीतून पळ काढत, सुटकेसाठी थेट पाण्यात उडी घेतली. मात्र तो पळून जाण्यात अपयशी ठरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. चौकशीदरम्यान पलायन करत आरोपीने नदीत उडी मारतानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.