देश-विदेश

BSF जवान सीमा ओलांडून पाकिस्तानात ; पाक रेंजर्सने घेतले ताब्यात

पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.

Published by : Shamal Sawant

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. सीमा सुरक्षा बलाचा एक सैनिक सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.

बुधवारी चुकून पाकिस्तानात घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये झालेल्या बैठकीत बीएसएफने आपल्या सैनिकाला परत पाठवण्याची मागणी केली. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर झिरो लाईनवर हा प्रकार घडला. पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर ही धक्कादायक घडना घडल्याचे समोर आले आहे.

सीमा रेषा ओळखता न आल्याने बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानात गेला आहे. बीएसएफ जवान काटेरी तारेच्या पलीकडे असलेल्या नो मॅन्स लँडमध्ये पिक कापणाऱ्या शेतकऱ्यांवर लक्ष ठेवत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."