देश-विदेश

LPG Gas : पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस सिलेंडर महाग, गृहीणी चिंतेत

एलपीजी गॅस संदर्भातील एक नवीन माहिती समोर आली आहे.

Published by : Shamal Sawant

देशातील सर्वसामान्य जनता महागाईमध्ये भरडली जात आहे. मोदी सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात तडकाफडकी वाढ केल्यानंतर देशभरात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण सरकारनं या प्रकरणात तातडीनं स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारनं वाढवलेल्या उत्पादन शुल्काचा कोणताही परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार नाही, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच तेल क्षेत्रातील पीएसयू कंपन्या उत्पादन शुल्कातील वाढीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं आहे.अशातच आता एलपीजी गॅस संदर्भातील एक नवीन माहिती समोर आली आहे.

गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत ही उज्ज्वला आणि बिगर उज्ज्वला धारकांसाठी लागू असणार आहे. त्यांना अधिकचे 50 रुपये मोजावे लागणार आहेत. सेन्सेक्सची घसरण आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर 550 रुपयांवर गेला आहे. तर बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर 803 वरून 853 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.

आधीच वाढणारी महागाई, त्यात सिलेंडरही महाग झालं आहे. त्यामुळे याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. एलपीजी गॅस दरवाढ आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.

आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. ही वाढ उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या सर्व ग्राहकांना लागू होईल. ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन मिळावे म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. नवीन किमतींनुसार उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?