जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशदवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक निष्पाप जण मृत्युमुखी पडले. या दहशदवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या किनारपट्टीवर त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) अंतर्गत 24-25 एप्रिल दरम्यान क्षेपणास्त्र चाचणी होणार आहे. अरबी समुद्रात पाकिस्तानच्या युद्धसरावाआधीच भारताची क्षेपणास्त्र चाचणी करण्यात येणार आहे. आयएनएस सूरतकडून क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली आहे. भारतीय संरक्षण संस्था या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
"पाकिस्तानने कराची किनाऱ्यावर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. संबंधित भारतीय संस्था सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत," असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. याचपार्श्वभूमिवर भारतीय नौदलाने सांगितले की, "त्यांच्या नवीनतम स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरतने समुद्राच्या पृष्ठभागावरून वेगाने जाणारे, कमी उंचीचे क्षेपणास्त्र लक्ष्य यशस्वीरित्या पार पाडले, जे आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे".
पहलगाममध्ये दहशदवादी हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये धर्म विचारुन दहशदवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच यावेळी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक वेळा गोळीबार केला. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. याचपार्श्वभूमिवर पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार एक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली आहे.
भारताकडून सडेतोड प्रतिसाद
कॅबिनेट सुरक्षा समितीकडून दहशदवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
भारतातील पाकिस्तान दुतावास बंद
अटारी वाघा बॉर्डर 1 मेपर्यंत बंद
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश
सरकार उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावू शकते
भारताने सिंधू पाणी करार तात्काळ लागू होण्यापासून रोखण्याची घोषणा केली.