देश-विदेश

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार

शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार, हवामानाची भूमिका निर्णायक

Published by : Team Lokshahi

नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे प्रमुख स्टीव्ह स्टिच यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "अ‍ॅक्सिऑम-4 मोहिमेच्या प्रगतीवर आमची सतत नजर आहे. सध्या अनडॉकिंगसाठी 14 जुलै हे निर्धारित लक्ष्य आहे."

या मोहिमेच्या कालावधीत, शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात विविध शास्त्रीय प्रयोग केले. यात 31 देशांचे एकूण 60 प्रयोग पूर्ण झाले असून त्यात भारताचे सात आणि नासाचे पाच प्रयोगही समाविष्ट होते. शुक्ला यांनी या काळात भारतातील लखनौ, बेंगळुरू, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

14 दिवसांच्या नियोजित मोहिमेनंतर आता ‘ग्रेस’ नावाची क्रू ड्रॅगन कॅप्सूल प्रशांत महासागरात उतरवण्यात येणार आहे. लँडिंगसाठी हवामानाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अ‍ॅक्सिऑम, स्पेस एक्स आणि नासा यांच्यातील समन्वयानुसार परतीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून परतीचे निश्चित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

या दोन आठवड्यांच्या अवकाश प्रवासात, चारही अंतराळवीरांनी 230 वेळा सूर्योदय-सूर्यास्त पाहिले असून, 400 किमी उंचीवरून फिरणाऱ्या ISS मधून त्यांनी ताशी सुमारे 28000 किमी वेगाने जवळपास 100 लाख किमीचा प्रवास केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर