गुरुवारी अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया चर्चेत आहे. एअर इंडिया ही टाटा समूहाची मालकीची आहे. या अपघातानंतर लोकांच्या मनात टाटा समूहाच्या विमानांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात 242 जण प्रवास करत होते, त्यापैकी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही या अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
एअर इंडियाची मूळ कंपनी टाटा ग्रुपने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही आम्ही उचलू असे ग्रुपने म्हटले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या अपघाताबाबत म्हटले आहे की त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत देण्यात यावी.