AMERICA VENEZUELA WAR ESCALATES AFTER TRUMP ORDER SPARKS GLOBAL CONTROVERSY 
देश-विदेश

America Venezuela War : ट्रम्प यांच्या आदेशानंतर आंतरराष्ट्रीय वाद पेटला; अमेरिकेच्या कारवाईने व्हेनेझुएलाचे राजकारण हादरले

Trump Order: ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी लष्करी कारवाई केल्याचा दावा समोर आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

नव्या वर्षाच्या सुरुवातीला जगाला धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएला देशावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे व्हेनेझुएलाच्या राजधानी काराकासमधील प्रमुख लष्करी तळावर स्फोट झाले असून, अनेक जण ठार झाल्याची नोंद आहे. सगळीकडे खळबळ उडाली असून, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक धमाल दावा केला आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी आता अमेरिकेच्या ताब्यात आहेत. या दोघांनाही देशाबाहेर नेले गेले असून, त्यांचे नेमके ठिकाण अद्याप उघड झाले नाही. अमेरिकन सैनिकांनी हे यशस्वी ऑपरेशन लॉ इन्फोर्समेंट विभागाच्या मदतीने पार पाडले, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव चालू होता. अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले होते, तर कॅरेबियन आणि पॅसिफिक समुद्रात लढाऊ जहाजे तैनात केली होती. ट्रम्प यांनी व्हेनेझुएला ड्रग्स तस्करीत सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी मादुरो यांनी ट्रम्प यांच्यावर सत्तांतर आणि तेल भांडारावर आक्रमणाचा हेतू असल्याचे सांगितले होते. आता हा वाद कोणत्या दिशेने जाईल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

  • ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेची व्हेनेझुएलावर मोठी कारवाई

  • काराकासमधील लष्करी तळांवर स्फोट झाल्याचा दावा

  • राष्ट्रपती निकोलस मादुरो ताब्यात असल्याचे ट्रम्प यांचे वक्तव्य

  • अमेरिका–व्हेनेझुएला संघर्षावर जगाचे लक्ष केंद्रित

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा