Arvind Kejriwal Vs Election Commission 
देश-विदेश

Arvind Kejriwal: यमुना नदीच्या पाण्यात विष, केजरीवालांचा हरियाणातील भाजप सरकारवर आरोप

अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील भाजप सरकारवर यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.

Published by : Gayatri Pisekar

दिल्ली विधानसभेची निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. प्रचारासाठी काही दिवसच बाकी आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीत सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. हरियाणात भाजपाचे लोक यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळत आहेत आणि तेच पाणी दिल्लीत पाठवलं जात असल्याचं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं होतं. केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर आता दिल्लीत राजकारण चांगलंच तापलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान आपचे अरविंद केजरीवाल आणि निवडणुक आयोगात चांगलीच जुंपली आहे. दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत.

दिल्ली निवडणुकीत यमुना वाद चांगलाचं गाजत आहे. यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा थेट आरोप आपचे अरविंद केजरीवाल यांनी केला होता. हा आरोप आता केजरीवालांना भोवण्याची शक्यता आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने आता अरविंद केजरीवालांना पाच प्रश्न विचारले आहेत.

अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सकाळीपर्यंत या पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. केजरीवाल यांनी जर उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. खरतर, दोन दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. हरयाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरयाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवलं आहे. मात्र, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.

निवडणूक आयोगानी केजरीवाल यांना विचारलेले प्रश्न

1. पाण्यात कोणतं विष आढळलं?

2. विष आढळल्याचा नेमका पुरावा काय?

3. विष आढळल्याची जागा कुठली?

4. जल बोर्डच्या कोणत्या अभियंताने विषाची पुष्टी केली?

5. अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केली?

संपूर्ण घटनाक्रम

27 जानेवारी: केजरीवाल यांनी यमुना प्रदूषणासाठी हरियाणाच्या भाजप सरकारला जबाबदार ठरवलं

28 जानेवारी: निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना पुरावे सादर करण्यास सांगितलं

29 जानेवारी: यमुनेचं पाणी प्रधानमंत्री पण पितात असं सांगितलं

29 जानेवारी: हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी हे यमुना नदीचं पाणी प्यायले

29 जानेवारी: अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलं

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप