(Asim Munir )पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य करत वादग्रस्त विधान केलं आहे. अमेरिकेतील टाम्पा येथे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांसाठी झालेल्या एका डिनर कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातील उद्योगसम्राट मुकेश अंबानी यांच्या जामनगर रिफायनरीवर हल्ल्याचा इशारा दिला.
मुनीर म्हणाले की, जर संघर्ष पेटला, तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करून पश्चिमेकडे जाऊ, आणि जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीपैकी असलेल्या जामनगर प्रकल्पावर हल्ला करू. पाकिस्तान अणुशक्ती असलेला देश आहे आणि जर आमचं अस्तित्व धोक्यात आलं, तर “आम्ही बुडालो तर अर्ध जगालाही सोबत घेऊन बुडू” असा दावा त्यांनी केला.
याआधीही मुनीर यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत उत्तेजक विधानं केली होती. आतासुद्धा मुनीर यांच्या भारतविरोधी धमक्या सुरूच आहेत.