देश-विदेश

India-Pakistan War : पाकिस्तानला बलोच आर्मीचाही दणका, लष्करी चौक्या ताब्यात, गॅस पाइपलाइनही फोडली

बलोच आर्मीने पाकिस्तानी लष्कराच्या अनेक पोस्टवर ताबा मिळवला आहे. त्याचप्रमाणे बलोच आर्मीने गॅस पाइपलाइन उडवल्याचा दावादेखील केला आहे.

Published by : Shamal Sawant

भारताने सर्व ठिकाणांहून पाकिस्तानला घेरलं आहे. काल रात्री उशिरा पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला केला. त्यानंतर त्यावर प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील पाकिस्तानमधील अनेक शहरांवर हल्ला चढवला. भारताकडून 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केले आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता बलोच लिबरेशन आर्मीनेदेखील पाकिस्तानवर हल्ला चढवला आहे. बलोच आर्मीने पाकिस्तानी लष्कराच्या अनेक पोस्टवर ताबा मिळवला आहे. त्याचप्रमाणे बलोच आर्मीने गॅस पाइपलाइन उडवल्याचा दावादेखील केला आहे.

टीटीपी हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक जवान मारले गेले आहेत. त्याचवेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशवादी अड्डे नष्ट केली आहेत. आता बीएलएने पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढवले आहे. त्यात 12 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला. बीएलएशी संबंधित मीडिया ग्रुप हक्कालने यासंदर्भात व्हिडिओ जारी केला आहे.

पाकिस्तानने ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या मदतीने भारतावर हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने वेळेवर प्रत्युत्तर देत पाकिस्तानची चार लढाऊ विमाने पाडली. यामध्ये दोन जेएफ-17 (जे चीनकडून मिळाले) आणि एक एफ-16 (जे अमेरिका पुरवते) समाविष्ट आहेत. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही या नुकसानीची कबुली दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा