( Bank Holiday) ऑगस्ट महिना म्हणजे सण-उत्सवांचा असतो. या महिन्यात अनेक सणांमुळे सार्वजनिक सुट्ट्या मिळतात. त्यामुळे या काळात बँकांची कामे पुढे ढकलल्यास अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या ग्राहकांना रोखीच्या व्यवहारांची किंवा चेक क्लिअरिंगसारख्या सेवा आवश्यक आहेत. त्यांनी ऑगस्टच्या सुरुवातीलाच बँकिंग व्यवहार पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
संपूर्ण महिन्यात जवळपास 15 दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी महत्वाची कामे जसे की चेक जमा करणे, डीडी तयार करणे यांची पूर्तता लवकर करावी. डिजिटल बँकिंग सेवा जसे की मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा नियमित सुरू राहतील.
ऑगस्ट 2025 मध्ये बँक सुट्ट्यांची यादी
3 ऑगस्ट (रविवार): सर्वत्र सुट्टी, त्रिपुरामध्ये केर पूजा
8 ऑगस्ट (गुरुवार): सिक्कीम व ओडिशामध्ये तेंडोंग लो रम फाटमुळे बंद
9 ऑगस्ट (शुक्रवार): रक्षाबंधन – अनेक उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुट्टी
10 ऑगस्ट (दुसरा शनिवार): सर्वत्र बँका बंद
13 ऑगस्ट (मंगळवार): मणिपूरमध्ये देशभक्ती दिनानिमित्त सुट्टी
15 ऑगस्ट (गुरुवार): स्वातंत्र्य दिन – संपूर्ण देशभर सुट्टी
16 ऑगस्ट (शनिवार): जन्माष्टमी व पारशी नववर्ष – गुजरात, महाराष्ट्रात सुट्टी
17 ऑगस्ट (रविवार): देशभरात सुट्टी
23 ऑगस्ट (चौथा शनिवार): बँका बंद
24 ऑगस्ट (रविवार): बँका बंद
26 ऑगस्ट (सोमवार): कर्नाटक व केरळमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी
27 ऑगस्ट (मंगळवार): महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा यांसह इतर राज्यांमध्ये गणेशोत्सव
28 ऑगस्ट (बुधवार): ओडिशा, सिक्कीम व पंजाबमध्ये नुआखाईनिमित्त बँका बंद
31 ऑगस्ट (रविवार): नेहमीप्रमाणे सर्वत्र सुट्टी