मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारतातील UPI प्रणालीचे कौतुक केले आहे. एका मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केल्याचे समोर आले आहे. बिल गेट्स यांनी भारतातील युपीआय तंत्रज्ञानावर भाष्य केले आहे. तसेच ही प्रणाली गेमचेंजर असल्याचेही ते म्हणाले आहेत.
UPI चं कौतुक करताना बिल गेट्स म्हणाले की, "जगभरात मी एकापेक्षा एक सरस भारतीयांना भेटलो आहे. अनेकांना भारताबद्दल फारशी माहिती नाही. त्यांनी भारतात आलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. असं झालं तर ते खूप काही शिकू शकतील असं मला वाटतं".