देश-विदेश

ChatGPT Plus वापरकर्त्यांसाठी 'Studio Ghibli' फीचर, फोटोंना देणार नवीन रूप

लोकप्रिय मीमला स्टुडिओ घिब्लीच्या फोटोमध्ये रूपांतरित करू शकता.

Published by : Team Lokshahi

सध्या ChatGPT चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच आता ChatGPTने एक नवीन फीचर लॉंच केले आहे. या नवीन फीचरने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. या फीचरचे नाव 'स्टुडीओ घिब्ली' असून यामधून तुम्ही तुमचे मस्त असे फोटो तयार करु शकता.

स्टुडिओ घिब्ली हे एक इमेज जनरेशन टूल आहे. ChatGPTच्या या वैशिष्ट्याद्वारे, यूजर्स त्यांचा कोणताही आवडता फोटो, चित्रपटातील फोटो किंवा कोणत्याही लोकप्रिय मीमला स्टुडिओ घिब्लीच्या फोटोमध्ये रूपांतरित करू शकता.

किती पैसे मोजावे लागतील?

ज्यांच्याकडे ChatGPT Plus आहे. जे GPT-4 Turbo वर काम करते आणि DALL-E द्वारे अशा इमेज तयार करू शकतात. जर एखाद्या नवीन यूजर्स हा AI इमेज जनरेटर वापरायचा असेल, तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्याला दरमहा अंदाजे 1,712 रुपये द्यावे लागतील.

फीचरचा वापर कसा करावा ?

- हे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅटजीपीटीमधील इमेज क्रिएटर ऑप्शनवर जा.

- त्यानंतर चॅटजीपीटीमध्ये Can you turn this into a Ghibli style photo?', 'Show me in Studio Ghibli style.', 'How would Ghibli sketch my features?' हा पर्याय निवडा

- घिब्ली-स्टाईलमध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडा

-GPT-40 मॉडेलला Make a Studio Ghibli version of this image असं प्रॉम्प्ट द्या

- तुमची घिब्ली-स्टाईल इमेज तयार होईल

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा