देश-विदेश

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी Lokशाहीची मोहीम, संपर्क करा; आम्ही तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहचवू

पहलगाम दहशतवादी हल्ला: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी लोकशाहीची मदत, संपर्क करा; तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहचवू.

Published by : Prachi Nate

काल जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. तसेच यावेळी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक वेळा गोळीबार केला. तसेच या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यामुळे स्थानिक लोकांसह पर्यटकांनाही ते दहशतवादी असू शकतात असा कोणताच अंदाज आला नाही. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यादरम्यान पहलगाममध्ये महाराष्ट्रातील काही लोकांचा देखील सहभाग होता. जम्मू काश्मीर मधील दहशत वादी हल्ल्यात पुण्यातील कर्वेनगर भागातील दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

लोकशाही मराठीच्या माध्यमातून एक आवाहन आम्ही करतोय काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी लोकशाही मराठीने मोहीम सुरु केलीये....अडकलेल्या पर्यटकांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक देतोय....हा क्रमांक तुम्ही TV स्क्रीनवर पाहताय... 93 21 29 53 62 या क्रमांकावर तुम्ही आमच्याशी संपर्क करा.... आम्ही तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहचवू...

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे हे पत्नी आणि मुलीसोबत तर कौस्तुभ गणबोटे पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. यावेळी गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिम मध्ये राहणारे अतुल मोने, हेमंत जोशी, आणि संजय लेले, यांचा मृत्यू झाला. हे तिन्ही कुटुंब दोन दिवसापूर्वी पत्नी मुलांसोबत काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते, मात्र दहशदवादी हल्यात हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, या तिघांचा मृत्यू झाला आहे. पनवेलच्या दिलीप देसले यांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पुण्यातील 2, डोंबिवलीतील 3, पनवेलमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा