Coronavirus update 
देश-विदेश

Coronavirus update : कोरोनाचा धोका वाढला; देशभरात 2710 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात किती?

(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भारतात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 2710 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1147 रुग्ण आढळले आहेत.

यासोबतच महाराष्ट्रात 424 रुग्ण आढळले असून कर्नाटक, तामिळनाडूत प्रत्येकी 148 रूग्ण सापडले असल्याची माहिती मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

गुजरातमध्ये 223 सक्रिय कोविड रुग्ण आहेत, 26 मे रोजी सरकारी आकडेवारीनुसार 1000 हून अधिक रुग्ण आढळले. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे गेली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात