दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी बघायला मिळत आहे. दिल्लीमधील विधानसभा निवडणुकांचा अंतिम निकाल काही तासांतच जाहीर होईल. मात्र आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजप आघाडीवर असलेला दिसून येत असून 'आप' मोठ्या संख्येने पिछाडीवर आहे. आपचे अरविंद केजरिवाल यांचादेखील पराभव झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. याचबरोबर आता अजित पवारांच्या बाबतीतील एक मोठी बातमी समोर आली आहे.
दिल्लीमधील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. राष्ट्रवादीचे 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या सगळ्याच उमेदवारांचा दारुन पराभव झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला केवळ 0.30% इतकेच मतदान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.