देशाची राजधानी दिल्ली येथे सत्ता पालट होण्याची शक्यता आहे. 5 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आघाडीवर असलेला दिसून येत आहे. तसेच गेली अनेक वर्ष सत्ता असणाऱ्या कॉँग्रेस पक्षाला व आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे 27 वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा कमळ फुलणार अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच भाजप पक्ष आनंद साजरा करताना दिसत आहेत. तसेच जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे आभारदेखील व्यक्त केले आहेत.
त्याचप्रमाणे आता भाजपने सत्तेत येण्याआधीच अनेक घोषणाही केल्या आहेत. या घोषणा नक्की कोणत्या आहेत? त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप सरकारने महिलांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. महिलांबरोबरच गरीब जनता. वृद्धांचा विचारदेखील केलेला आहे.
भाजप पक्षाने कोणत्या घोषणा केल्या आहेत?
- महिलांना दरमहा 2500 मिळणार
- बसमध्ये महिलांना मोफत प्रवास
- वृद्धांना दरमहा 25000 रुपये पेन्शन मिळणार
- होळी व दिवाळीला एक-एक सिलेंडर मोफत मिळणार
- 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार
- महिन्याला 20 हजार लीटर पाणी मोफत मिळणार आहे
- वृद्धांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार