देश-विदेश

Eknath Shinde : सय्यद आदिलच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्र्यांची पाच लाख रुपयांची मदत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद

अवघ्या 20 वर्षीय सय्यद आदिल हुसेन शाहने माणुसकी दाखवत दहशतवाद्यांना सामोरा गेला.

Published by : Shamal Sawant

काश्मीरमध्ये पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुमारे 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र यामध्ये एक व्यक्ती असा होता ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे रक्षण करण्यासाठी समोर आला. अवघ्या 20 वर्षीय सय्यद आदिल हुसेन शाहने माणुसकी दाखवत दहशतवाद्यांना सामोरा गेला. मात्र दहशतवाद्यांना सामोरे जाताना त्याला जीव गमवावा लागला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सय्यद आदिलच्या कुटुंबीयांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.सय्यद आदिलने बहादुरी दाखवत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगासमोर दाखवून दिले आहे, त्याचे हौतात्म्य वाया जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शाह कुटुंबियांचे सांत्वन केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा