देश-विदेश

"Dolo-650 ची गोळी चॉकलेटसारखी...", अमेरिकेतील डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि आरोग्य शिक्षक पलानी अप्पन माणिकम यांनी लक्ष वेधले आहे.

Published by : Shamal Sawant

भारतात पॅरासिटामॉल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. बरेच लोक तापाच्या अगदी छोट्या कारणासाठीही घेतात. अशातच विविध ब्रँडपैकी डोलो 650 ही गोळी अलिकडच्या काळात अधिक लोकप्रिय झाली आहे. या गोळीच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. याबद्दल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि आरोग्य शिक्षक पलानी अप्पन माणिकम यांनी लक्ष वेधले आहे. याबद्दल डॉक्टरांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

माणिकम यांनी ट्वीट करत लिहिले की, "भारतीय लोक डोलो 650 ला कॅडबरी जेम्ससारखे घेतात," या पोस्टला अनेक लाईक्स तसेच कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तसेच डॉक्टरांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होताना दिसत आहे. भारतामध्ये डोलो 650 ही गोळी जर ताप, डोकेदुखी किंवा शरीरदुखी आशा समस्यांवर डॉक्टरांकडून लिहून दिली जाते. त्याचप्रमाणे ही गोळी योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेण्याचा सल्ला दिला जातो. पण या गोळीचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यास ते तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

'डोलो 650' चा वापर कधी वाढला ?

कोविड-19 साथीच्या काळात या औषधाची लोकप्रियता वाढली, विशेषतः जेव्हा लोकांना लसीकरणानंतर दुष्परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला देण्यात आला.

'डोलो 650' ची विक्रमी विक्री :

फोर्ब्सच्या मते, 2020 मध्ये कोविड-19 च्या उद्रेकापासून मायक्रो लॅब्सने डोलो-650 च्या 350 कोटींहून अधिक टॅब्लेट विकल्या आहेत, ज्यामुळे एका वर्षात सुमारे 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मार्केट रिसर्च फर्म IQVIA नुसार, साथीचा रोग सुरू होण्यापूर्वी मायक्रो लॅब्स दरवर्षी डोलो-650 च्या सुमारे 7.5 कोटी स्ट्रिप्स विकत असत. एका वर्षानंतर, ती वाढून 9.4 कोटी स्ट्रिप्स झाली, 2021 च्या अखेरीस 14.5 कोटी स्ट्रिप्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी, 2019 च्या आकड्याच्या जवळजवळ दुप्पट झाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा