थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कायदे आणखी कठोर करताना पाहायला मिळत असून ट्रम्प यांना आता १९ नव्हे तर ३० देशांच्या लोकांना अमेरिकेत एन्ट्री नसल्याचे पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प लवकरच अमेरिकेतील प्रवेशाचे नियम काही देशांसाठी अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तान, चाड, काँगो, एरिट्रिया, इराण, लिबिया, म्यानमार, सोमालिया, सुदान, येमेन, इक्वेटोरियल गिनी आणि हैती या १२ देशांवर पूर्णपणे प्रवास बंदी घातली असून याशिवाय, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांवर आंशिक बंदी लागू असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रवास बंदीची संख्या 19वरून वाढवून जवळपास ३० देशांपर्यंत विस्तारण्याची तयारी सुरू केली असून यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने या देशांतील नागरिकांचे व्हिसा आणि ग्रीन कार्ड अर्ज थांबवण्यास सुरुवात केली आहे.
summary
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
30 देशांच्या लोकांना अमेरिकेत 'नो एन्ट्री'
डोनाल्ड ट्रम्प यांचे कायदे आणखी कठोर