थोडक्यात
ट्रम्प यांची व्हाइट हाउसमध्ये दिवाळी
काश पटेल, तुलसी गॅबार्ड, कुश देसाई उपस्थित
अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा उपस्थित
( Donald Trump) दिवाळीला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी जल्लोषात दिवाळी साजरी करण्यात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा उपस्थित होते.
ट्रम्प म्हणाले की, "मी भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज तुमच्या पंतप्रधान मोदींशी बोललो. आमच्यात चांगली चर्चा झाली आहे.