( Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांच्यावर टीका केल्यानंतर मंगळवारी टेस्लाचे शेअर्स 5% घसरले. Truth Social या प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी मस्क यांना "इतिहासातल्या सर्वात जास्त सरकारी सबसिडी मिळवणारा व्यक्ती" म्हटलं आणि DOGE या शासकीय संस्थेला मस्क यांच्या कंपन्यांसोबतच्या करारांची तपासणी करण्यास सांगितलं.
"सबसिडीशिवाय एलनला कदाचित आपली कंपनी बंद करून दक्षिण आफ्रिकेत परत जावं लागलं असतं," असं ट्रम्प यांनी म्हटलं. त्यांनी EV (इलेक्ट्रिक वाहन) अनिवार्यतेच्या विरोधातील आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आणि मस्क यांना याबद्दल आधीपासूनच माहिती होती असं सांगितले आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या फेब्रुवारीतील विश्लेषणानुसार, मस्क यांच्या कंपन्यांना गेल्या दोन दशकांत किमान $38 अब्ज इतकं सरकारी अनुदान, कर सवलती, कर्जं आणि करार मिळाले आहेत.
ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर त्यांच्या "Big Beautiful Bill" या वादग्रस्त GOP कर व खर्च विधेयकावर केलेल्या टीकेवरही बोलले आहेत. मस्क यांनी अलीकडेच या विधेयकाला "पूर्णपणे विध्वंसक" असे म्हणत लाखो नोकऱ्यांचा धोका असल्याचं म्हटलं होतं.
टेस्लाचे शेअर्स अजूनही वर्षाच्या सुरुवातीपासून 21% घसरले आहेत, त्यामागे टॅरिफ वाद, EV मागणीतील घट आणि राजकीय वाद हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.