अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या नवनव्या निर्णयांमुळे जगभर चर्चेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना मोठा इशारा दिला आहे. आता त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रिक्स राष्ट्र ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे त्यांचं नवं चलन सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत. मात्र, ट्रम्प यांनी यावरून ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे.
BRICS ही ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या दहा देशांची आंतरसरकारी संघटना आहे. 2009 मध्ये स्थापन झालेल्या BRICS हा एकमेव मोठा आंतरराष्ट्रीय गट आहे, ज्याचा अमेरिका भाग नाही. गेल्या काही वर्षांत ब्रिक्समधील देश, विशेषतः रशिया आणि चीन, अमेरिकन डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिक्सचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या भारताने मात्र याआधीच 'डी-डॉलरायझेशन' च्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते की, भारत कधीही 'डी-डॉलरीकरण'च्या बाजूने नाही आणि ब्रिक्स चलन तयार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
पाहा काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?