देश-विदेश

Pahalgam Terror Attack : "प्लॅन - ए फेल झालाय, 35 बंदुका..." पहलगाममधील दहशदवाद्याचा फोनकॉल ऐकल्याचा जौनपूरच्या पर्यटकाचा दावा

पहलगाम हल्ल्यादरम्यान जौनपूरच्या पर्यटकाने दहशदवाद्यांचा फोनकॉल ऐकला, 35 बंदुका पाठवण्याची चर्चा

Published by : Prachi Nate

जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर दहशदवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 हुन अधिक लोक मृत्युमुखी पावले. यादरम्यान आता भारतातून मोदी सरकार अॅक्शनमोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून हल्ला करणाऱ्या दहशदवाद्यांचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर काही क्षणात हल्ला करणाऱ्या दहशदवाद्यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला.

त्यानंतर त्यांच्यातील काही दहशदवाद्यांवर 20 लाखांच बक्षीस जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक जणांकडून हल्ल्याच्या वेळी त्या दहशदवाद्यांना पाहिल्याचा दावा करत आहेत. अशातच जम्मू-काश्मीरवरुन परतलेल्या उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या एकता तिवारी यांच्या ग्रुपची त्या दहशदवाद्यांपैकी दोघांसोबत भेट झाली असून त्यांच्या ग्रुपसोबत थोडा वाद झाल्याचं एकता तिवारी यांनी सांगितलं.

यादरम्यान सांगताना एकता तिवारी म्हणाल्या की, "आमच्या ग्रुपमध्ये 20 जण होती आणि आम्ही 13 एप्रिलला जम्मू-काश्मीरमध्ये आलो. त्यानंतर 20 एप्रिलला पहगाम फिरण्यासाठी गेलो. ज्यावेळी आम्ही पहलगाममध्ये होतो त्यावेळेस खेचरावरुन जात असताना दोन जण आम्हाला भेटले. त्यावेळी ते आम्हाला आमच्या धर्माबद्दल विचारत होते. आमचा किती जणांचा ग्रुप आहे? तसेच कुराण वाचायला येत का? असं देखील त्या दोघांनी विचारलं".

"एवढचं नाही तर माझ्या भावाने रुद्राक्षाची माळ घातली होती त्यावरुन देखील त्याने विचारलं की, ही माळ का घातली? त्यांच्या या प्रश्नावर माझा भाऊ बोलला मला ही माळ घालायला आवडते. हे ऐकताच ते आमच्यासोबत वाद घालायला लागले. तिथे आम्हाला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि त्यामुळे आम्ही बैसरनपासून जवळपास 500 मीटरवर उतरलो. तिथून आम्ही दुसऱ्या खेचरवाल्यांच्या मदतीने वर खोऱ्यात न जाता परत खाली उतरलो".

संशयास्पद वाटलेल्या गोष्टींवरुन एकता तिवारी म्हणाल्या की, "ज्यावेळेस ते आमच्यासोबत होते त्यावेळेस त्यांच्यातलं एकाला कोणाचा तरी कॉल आला. त्यावेळी तो आमच्यापासून थोडा लांब गेला आणि फोनवर बोलत होता. त्यावेळेस मी त्याच्या फोनवर सुरु असलेल्या वार्ता ऐकल्या. तो माणूस कॉलवर असणाऱ्या व्यक्तीला सांगत होता की, प्लॅन - ए फेल झाला आहे आणि 35 बंदुका खोऱ्यात पाठवण्याविषयी बोलत होता. ज्या व्यक्तीला फोन आला त्या व्यक्तीचा फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहे".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू