(Afghanistan Earthquake) अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला असून गेल्या चार दिवसांत देशात सलग चौथा भूकंप झाला असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8:54 वाजता हा भूकंप झाला.
यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 140 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जाते.