थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Japan Earthquake ) सरत्या वर्षाला निरोप देत संपूर्ण देश नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. राज्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यातच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये भूकंप झाला आहे.
जपानमध्ये याच महिन्यात 8 तारखेला भूकंप जाणवला. यात अनेक लोक जखमी झाले होते.आज पुन्हा जपानमध्ये भूकंप झाला असून 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नोडा शहराच्या पूर्वेला ९१ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणावला.
भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
Summary
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये भूकंप
नोडा सिटी परिसरात 6 रिश्टर स्केलचा भूकंप
दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही