(Earthquake in Alaska) अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. अलास्कामध्ये अनेक ठिकाणी 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला असून भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
भूकंपानंतर सर्वजण घराबाहेर पळाले. किनारी भागात राहणाऱ्या मच्छिमारांनाही याचा मोठा फटका बसला आहे. भूकंपाचे केंद्र सँड पॉइंटपासून सुमारे ८७ किलोमीटर दक्षिणेस होते.भूकंपामुळे किती नुकसान झाले याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
दक्षिण अलास्का आणि अलास्का द्वीपकल्पासह केनेडी प्रवेशद्वार, अलास्कातील युनिमॅक पास आणि पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात त्सुनामीचा धोका असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाने किनारी भागात राहणाऱ्या लोकांना घरे सोडण्यास सांगितले आहे.