भारतासह मान्यमार,अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून उत्तराखंडमधील चमोली येथे भूकंप झाला. त्याची तीव्रता 3.3 असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानात शनिवारी रात्री दोन भूकंपाचे धक्के जाणवले.
या दोन भूकंपामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये एकाची तीव्रता 4.2 इतकी मोजण्यात आली. तर दुसरा भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी मोजण्यात आली. म्यानमारमध्ये 3.7 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले त्याची खोली 105 किलोमीटर होती. अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला.