देश-विदेश

HMPVची महाराष्ट्रात एन्ट्री, नागपुरात 2 रुग्ण

नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. सात वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.

Published by : shweta walge

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. अहमदाबादमध्ये 1, महाराष्ट्रातील नागपूर आणि बेंगळुरूमध्ये प्रत्येकी 2, चेन्नईमध्ये 1 आणि कोलकातामधील 1 मुलाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे. तर राज्य आणि केंद्र सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नागपुरात एचएमपीव्ही चे 2 रुग्ण संशयित आढळले आहेत. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णलायांतून सांगितलं जातं आहे. यामध्ये सात वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत.

व्हायरस नेमका काय आहे?

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा थंडीच्या दिवसांमध्ये जास्त वेगानं पसरतो. तो फुफुस्सांमध्ये वेगानं पसरतो आणि त्यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका असतो. परिणामी श्वास घ्यायलाही त्रास होते. छाती भरुन येते, लहान मुलं आणि वृद्धांना हा व्हायरस जास्त प्रभावित करतो. सगळ्यात आधी 2001 साली या व्हायरसची ओळख पटली होती. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंक दिल्याने तसंच त्याच्याशी हात मिळवल्याने किंवा त्याला स्पर्श केल्यानेही पसरू शकतो. एचएमपीव्ही व्हायरसने संक्रमित झाल्याच्या पाच दिवसांनंतर या व्हायरसची लक्षणं दिसायला लागतात.

HMPV व्हायरसचे लक्षण

कोरोना सारखे लक्षण

ताप आणि खोकला

श्वास घ्यायला त्रास

फुफ्फुसात संक्रमण

नाक बंद होणं

गळ्यात घरघर होणं

संसर्गजन्य रोग, संपर्कात आल्याने फैलावतो

काय काळजी घ्याल?

शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करा. हात वारंवार धुवावेत. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. ताप, खोकला असताना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा. सर्दी, खोकला झाल्यास स्वत:च्या मनाने औषध घेऊ नका. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका. लहान मुलं, वृद्धांनी विशेष काळजी घ्या. एचएमव्हीपी आजाराला घाबरण्यापेक्षा काळजी घ्या, काळजी करु नका असं तज्ज्ञ सांगतात. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनी बिनधास्तपणे वागू नये असंही तज्ञ सांगतात. एचएमव्हीपी आजार गंभीर नसला तरी त्याला कोरोनाप्रमाणं गांभीर्यानं घ्यायला हवं.अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळं सावधगिरी हेच मोठं औषध असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन