भारतात ईव्हीएम घोटाळा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. मात्र आता ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो असा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे. ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनेच ईव्हीएमचे पितळ उघडे पाडले आहे. गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गब्बार्ड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच गौप्यस्फोट केला. ईव्हीएम मशीन सहज हॅक केले जाऊ शकते, याचे पुरावे हाती लागल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गब्बार्ड यांनी बैठकीत दिली.
तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने दावा केला आहे की आतापर्यंत झालेल्या मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटची पुष्टी झाली आहे, जी ईव्हीएम मतांशी जुळताना बरोबर आढळली. भारतीय ईव्हीएम आणि इतर देशांच्या ईव्हीएममधील हे फरक आयोगाने सांगितले.