देश-विदेश

चिंताजनक! चीनच्या व्हायरसची भारतात एन्ट्री; ८ महिन्याच्या बाळाला संसर्ग

भारतामध्ये एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ८ महिन्याच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झाला आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

Published by : shweta walge

भारतामध्ये एचएमपीव्ही (ह्यूमन मॅमलियान पॉक्स व्हायरस)चे दोन रुग्ण आढळले आहेत. पहिली केस बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आली आहे. या व्हायरसचा संसर्ग ८ महिन्यांच्या बाळाला झाला आहे.

बेंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचपीव्हीची लागण झाली आहे, तिची लक्षणे त्याच दिशेने दर्शवत आहेत, अहवालातही व्हायरसची पुष्टी झाली आहे. ही चाचणी एका खासगी रुग्णालयाने केली होती ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळली. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचे आहेत. 

चीनमध्ये कोरोनानंतर आता एक नवा व्हायरस धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळत आहे. चीनमध्ये HMPV Virus नं डोकं वर काढलं असून या आजाराची साथच चीनमध्ये पसरल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत.

एचएमपीव्ही या व्हायरसच्या चीन देशातील उद्रेकानंतर खबरदारीचा उपाय म्हणून  राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

चीनमधून आलेला नवा व्हायरस Human Metapneumovirus (HMPV) बाबत तसं पाहायला गेलं तर, चिंतेचं कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे .

काय आहेत लक्षणं?

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा एक व्हायरस आहे, ज्याची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात. सामान्य प्रकरणांमध्ये, यामुळे खोकला किंवा घरघर, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं होतो. लहान मुलं आणि वृद्धांमध्ये, एचएमपीव्ही संसर्ग गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसू शकतात. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...